अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न.


अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव उत्साहात संपन्न.
उरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )उरण शहरातील वाणी आळी येथे जैनाचे फार जुने मंदिर आहे. हे मंदिर जीर्ण झाल्याने या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला. दिनांक 30/5/2023 ते 9/6/2023 या कालावधीत श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ उरण तर्फे अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात तसेच मंदिराजवळून काही अंतरावर असलेल्या सेंट मेरी कॉन्वेन्ट स्कूलच्या ग्राउंड वर भव्यदिव्य अशा मंडपात या महोत्सव दरम्यान विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाणी आळी येथील मंदिरात श्री शंखेश्वर पार्श्वनाथ भगवान,श्री आदिनाथ दादा, श्री सीमंधर स्वामी, श्री पदमावती देवी, श्री महालक्ष्मी माता या देवतेचे दि 8 जून 2023 रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा प. पू. सरलस्वामी आचार्य श्रीमद विजय जयशेखरसूरीश्वरजी म.सा तसेच पू. कार्यकूशल मुनिराज श्री केवल पूर्णविजयी म. सा. यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.दि 9 जून 2023 रोजी या महोत्सवाची सांगता झाली. दि 9 जून 2023 रोजी वाणीआळी मधील मंदिर सर्व भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले
.मंदिराभोवती, मंदिरावर तसेच सेंट मेरी ग्राउंड वरील सभा मंडपावर भव्यदिव्य असे विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली. सर्व धार्मिक विधी, सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ उरणच्या पदाधिकारी सदस्यांनी व भाविक भक्तांनी विशेष मेहनत घेतली.


थोडे नवीन जरा जुने