मैत्री करून तिचे नग्न विडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पनवेल तालुका पोलिसांनी केली अटक








अल्पवयीन मुलीबरोबर समाजमाध्यमांवरून मैत्री करून तिचे नग्न विडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पनवेल तालुका पोलिसांनी केली अटक
पनवेल दि.२२ (संजय कदम) : स्नॅपचॅट अँपवरून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख व संपर्क करून तिला तिचे नग्न फोटो व व्हिडीओ पाठविण्यास प्रवृत्त करून नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पनवेल तालुका पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे.


पनवेल तालुक्यातील हेदुटणे येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीची तिचे आईचें मोबाईल फोनवरून सिराज चौधरी या नाशिक येथे राहणान्या इसमासोबत स्नॅपचॅट वरून ६ ते ७ महिन्यापुर्वी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिचे सोबत वॉटस अॅपवर चॅटींग करून ती अल्पवयीन असल्याचे माहीती असताना देखील तिचे आई-वडीलांना त्यांचेतील संबंधाबद्दल सांगतो अशी धमकी देवुन तिला तिचे न्युड / नग्न फोटो व व्हिडीओ पाठवण्यास प्रवृत्त केले.



सिराज चौधरी यास तिचे न्युड फोटो व व्हिडीओ प्राप्त झाल्यानंतर त्याने सदरचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन सदर अल्पवयीन मुलीस तिचे राहते घराच्या खाली बोलावुन जबरदस्तीने तिचा हात पकडुन तिचेसोबत सेल्फी काढला. व त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीचे नग्न फोटो व व्हिडीओ तिला तिचा आतेभाऊ यांना पाठवुन सदरचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन त्यांचेकडे ५० हजार रूपये रक्कमेची मागणी केली तसेच सदर अल्पवयीन मुलीचे नाव व फोटो वापरून इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर फेक आयडी बनविला. वरील घटनेबाबतची माहीती अल्पवयीन मुलीच्या आत्येभावाने अल्पवयीन मुलगी तिचे आई-वडीलासह अतिशय भयभित स्थितीत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे येथे आली व त्यांनी याबाबत पोलीसांना माहीती दिली



. पनवेल तालुका पोलिसांनी सिराज चौधरी (रा. नाशिक) यांचेविरूध्द विनयभंग, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद केला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांचे सुचनेप्रमाणे सपोनि निलेश फुले, सपोनि अविनाश पाळदे, सपोनि अंबिकर अंधारे यांनी सायबर / तांत्रिक तपास करून सदर गुन्हयातील आरोपी सिराज अहमद आबीद अली चौधरी (वय १९) याचा सहभाग निष्पन्न केला.


 पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने विनाविलंब नाशिक येथे जावुन गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ६ तासात स्थानिक पोलीसांची मदत घेवुन आरोपी सिराज चौधरी याला शिताफीने ताब्यात घेवुन चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.


थोडे नवीन जरा जुने