४० वर्षीय इसम बेपत्ता


४० वर्षीय इसम बेपत्ता
पनवेल दि.२२ (संजय कदम) : पनवेल जवळील पेठगाव येथून एक ४० वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.               संजय हरिश्चंद्र पिंपळे असे या इसमाचे नाव असून तो बरेच दिवस त्याच्या बुलढाणा येथील मुळ गावी न आल्याने तसेच त्याच्याबरोबर संपर्क न झाल्याने त्याचा मावसभाऊ हा त्याला बघण्यासाठी त्याच्या सध्याच्या पेठगाव येथील राहत्या घरी आला असता तो त्याला तिथे सुद्धा सापडून आला नाही. त्यामुळे त्याने तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संजय पिंपळे हरवल्याची तक्रार दाखल केली. संजय पिंपळे ची उंची ५ फूट २ इंच असून बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, केस काळे, नाक बारीक, मिशी काळी व दाढी खुरटी असून त्याला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. सदर इसमाबद्दल कोणास काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार राजेंद्र केणी यांच्याशी संपर्क साधावा. थोडे नवीन जरा जुने