पनवेल एजुकेशन सोसायटीतर्फे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्याथ्र्यांचा भव्य सत्कार व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न
पनवेल दि.२२(संजय कदम): पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज पनवेल, पी. ई. एस. इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज पनवेल, नेशनल उर्दू हायस्कूल व जुनियर कॉलेज पनवेल तसेच अंगलो उर्दू हायस्कूल बारापाडा या शाळातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्याच्या गुणवत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संस्था संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज, पनवेल येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाने, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक लालसिंघ राजपूत, पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आणि पनवेल एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी यांच्यातर्फे संस्थेच्या शाळामधून ९३.२०% गुण मिळवून दहावीमध्ये प्रथम येणाऱ्या नेशनल उर्दू हायस्कूल तलोजाच्या तैवा एम. अर्शद पटेल या विद्यार्थिनीला रोख एक लाख रुपयांचे पारितोषिक पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पंकज इहाने यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. याकुब बेग हायस्कूल मधून ९३.००% गुण मिळवून प्रथम येणाऱ्या मसिरा सादिक शेख या विद्यार्थिनीला संस्थेतर्फे रोख २५०००/- रुपये देवून सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग अशोक लालसिंघ राजपूत यांच्याहस्ते देवून सत्कार करण्यात आला
तसेच अंगलो उर्दू हायस्कूल बारापाडा शाळेतून ११.२०% गुण मिळवून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीलासुद्धा संस्थेतर्फे २५०००/- रुपये रोख देवून शिंद साहेब पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस स्टेशन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी व संस्थेच्या इतर सदस्यांनी केले. इतर २४ गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून करण्यात आला. याप्रसंगी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी यांच्यातर्फे बह्या पुस्तकें तसेच गणवेश वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री पंकज डहाने, पोलीस उपायुक्त परिमंडळ २ यांनी विद्यार्थ्यांनी मोबाइलचा उपयोग कशा पद्धतीने करणे गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
श्री अशोक लालसिंघ राजपूत सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक मादर्शन केल्याने संस्थेचे अध्यक्ष इक्बाल काझी यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष अब्दुल मुकीत अब्दुल लतीफ काझी यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. इक्वाल हुसैन काझी यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे सदुपयोग, सामाजिक जीवनात वावरताना कशा पद्धतीने वागावे याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी पनवेल एजुकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अब्दुल मुकीत अब्दुल लतीफ काझी, सचिव मोहम्मद नूर हसनमिया पटेल, याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेजचे चेअरमन असिफ हसन करेल,
अंगलो उर्दू हायस्कूल बारापाडाचे चेअरमन नवीद अब्दुल कादिर पटेल, नेशनल उर्दू हायस्कूल तलोजाचे चेअरमन साजिद नासीर पटेल, संस्थेचे सदस्य निसार अब्दुल हमीद पटेल, अझीम शब्बीर मुल्ला, जव्वाद मुकीत काझी, यासिर रइस दाखवे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक / प्राचार्य पत्रकार, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकारी व उपस्थितांचे स्वागत याकुब वेग शाळेचे प्राचार्य आसीम पटेल यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थित पाहुण्यांचे आभार शाळेच्या शिक्षिका शिरीन सय्यद यांनी केले.
Tags
पनवेल