अनधिकृत फलकांवर महापालिकेची कारवाई

अनधिकृत फलकांवर महापालिकेची कारवाई 
पनवेल दि.२२ (संजय कदम) : पनवेल शहरात खासगी क्लासेसने प्रसिद्धीसाठी शहरभर बॅनरबाजी करत असल्याची तक्रार पनवेल महानगरपालिकेकडे आल्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ दखल घेत शहरातील विविध भागात असलेल्या अनधिकृत फलकांवर कारवाई करून ते काढून टाकले आहेत.   सध्या शैक्षणिक वर्ष सुरु झाले असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खाजगी क्लासेसने शहरभर बेकायदा बॅनरबाजी सुरु केली आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेडे हे अनधिकृत फलक ताबडतोब काढून टाकावी अशी तक्रार नागरिकांकडून मिळाल्यानंतर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागात असलेल्या अनधिकृत फलकांवर कारवाई करून ते काढून टाकले आहेत. तसेच यापुढे अश्याप्रकारे अनधिकृतपणे जाहिरात केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.थोडे नवीन जरा जुने