पनवेल दि.२२ (संजय कदम) : जागतिक योग दिन पनवेल मधील पार्श्व महिला फाउंडेशनने आगळ्या वेगळ्या पद्दतीने साजरा केला. जिल्हा परिषद शाळेतील मुलांसह दिव्यांग मुलांबरोबर योग अभ्यासने करून पार्श्व महिला फाउंडेशनच्या सदस्यांनी योग दिन साजरा केला. त्याचबरोबर त्या मुलांना नाश्ता व एनर्जी ड्रिंकचे वाटप केले.
जागतिक योग दिन २१ जून रोजी संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल मधील पार्श्व महिला फाउंडेशनने रायगड जिल्हा परिषदेच्या वडघर येथील शाळेत व दिव्यांग मुलांबरोबर योग दिन साजरा केला. यावेळी 'पूर्वी योग आणि फिटनेस स्टुडिओ' च्या पूर्वी निसार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले.
यावेळी पार्श्व महिला फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना योग अभ्यासनानंतर नाश्ता व एनर्जी ड्रिंकचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा बसंती जैन, सदस्या नेहा गांधी, पायल कोठारी, धनश्री गुंडेचा, प्रतिभा डांगी, काजल धेडिया, प्रिती मुनोथ, आकांशा बनथिया यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags
पनवेल