बनावट नंबरप्लेट लावलेली चोरीची मोटारसायकलचा वाहतूक पोलिसांनी घेतला शोध


बनावट नंबरप्लेट लावलेली चोरीची मोटारसायकलचा वाहतूक पोलिसांनी घेतला शोध
पनवेल दि.२२ (संजय कदम) : पनवेलसह नवी मुंबईमध्ये वाढत्या वाहनचोरी आणि घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलिसांना चोरीची वाहने शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार आपले कर्तव्य बजावत असताना बनावट नंबरप्लेट लावलेल्या आणि अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या मोटारसायकलचा शोध घेऊन गुन्हा दाखल झालेल्या पोलीस स्थानकाच्या ताब्यात दिले.            सध्या पनवेलसह नवी मुंबई परिसरातून वाहनचोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. याची दखल घेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वाहनचोरी आणि घरफोड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. त्यानुसार वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरूपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कळंबोली वाहतूक शाखेचे वपनि हरीभाऊ बानकर यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून कर्तव्यादरम्यान चोरीची वाहने शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार वाहतूक क्रेनवरील पोलीस अंमलदार पोना अनिल रोकडे व पोना भिमराव मिसाळ हे कामोठे परिसरात गस्त करीत असताना, सेक्टर ०८ या ठिकाणी दुचाकी वाहन क्र एमएच ४६ एके ९१२३ हे फुटपाथवर अनधिकृतरीत्या पार्क केल्याचे दिसुन आले. त्यावेळी सदर ठिकाणी मेगाफोनव्दारे वाहन काढणेबाबत कळविले असता, सदर वाहन कोणीही काढले नाही. त्यावेळी सदर वाहनांस कारवाईकामी कळंबोली वाहतूक शाखा येथे टोविंगव्दारे आणले. त्यावेळी पोहवा अतुल शिंदे यांनी वाहनांचे नंबरची ई चलान मशिनव्दारे खात्री केली असता, सदर प्रकारचे वाहन हे अस्तित्वात नसल्याचे दिसुन आले. त्यामुळे वाहनाचा 'चेसिस नंबर काढुन त्याबाबत पुन्हा खात्री केली असता वाहनाचा नंबर डुप्लीकेट असल्याचे दिसुन आले. 
सदर वाहनाचा खरा नंबर काढून मुळ मालकांस संपर्क केला असता त्यांनी सदर वाहन हे चोरीस गेले असून त्याबाबत आग्रीपाडा पोलीस ठाणे, मुंबई शहर येथे तक्रार दाखल केलेली असल्याचे कळविले. त्यानुसार आग्रीपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून वाहन त्यांचे ताब्यात देण्यात आले. 


थोडे नवीन जरा जुने