उदयोन्मुख क्रिकेटपटू वैदश्री शेळके हिचा शेकाप तर्फे सत्कार...
उदयोन्मुख क्रिकेटपटू वैदश्री शेळके हिचा शेकाप तर्फे सत्कार...

क्रिकेट हा खरेतर मुलांचा खेळ पण हल्ली मुली देखील यात मुलांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वी होत आहेत. कामोठे मधील सेक्टर ९ येथे राहणाऱ्या कु. वैदश्री निलेश शेळके हिने क्रिकेट मध्ये उल्लेखनीय प्रावीण्य संपादन केल्याने तिची रायगड जिल्हा क्रिकेट मध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या संघात यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली असून मागील आठवड्यात नाशिक येथील राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी करून आपली निवड सार्थक ठरवली आहे.
वैदश्रीने कामोठे मध्येच करण क्रिकेट अकादमी सेक्टर ९ मधील मैदानात प्रशिक्षण घेत असून मुलांबरोबर दररोज न चुकता 3-4 तास सराव करते. शाळा आणि क्रिकेटचा सराव यात तिने योग्य समन्वय साधला आहे.वैदश्री केलेल्या कामाची दखल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने घेऊन मा. आ. विवेकानंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. आ. बाळाराम पाटील, मा. नगरसेवक प्रमोद भगत, शंकर म्हात्रे, राकेश केणी, मधुकर सुरते, ज्ञानेश्वर म्हात्रे, पंडित गोवारी, गौरव पोरवाल, नितीन पगारे, विश्वास भगत, उषा झणझणे, शुभांगी खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.माझी आताच सुरुवात होत आहे. येथून पुढे बरीच मजल मारायची आहे. आई-वडील यांचा भक्कम पाठिंबा आणि करण कांबळे सर, शंकर रेड्डी सर यांचे योग्य मार्गदर्शन यातून वाटचाल सुरू आहे. 
थोडे नवीन जरा जुने