पनवेल दि.२१ (संजय कदम) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात वेगाने करत असलेल्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन राज्यभरातून विविध पक्षाचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत.
त्याअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेना पनवेल महानगर जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विविध पक्षासह सामाजिक कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.
पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे झालेल्या या पक्षप्रवेशात सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव, अंबादास पाटील, नितेश बानगुडे-पाटील, गजेंद्र आहिरे, हितेंद्र पेडामकर, आशिष चोपडा, महेंद्र गावंड, संतोष गावंड, किशोर पाटील, स्वप्नील मोरे, खंडू लहाने, महावीर गुप्ता, प्रनय घरत, जगन्नाथ साळवे, आसाराम चौरसिया, अनिल सिंग यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी मावळचे खासदार व शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना पनवेल शहर जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, शहराध्यक्ष प्रसाद सोनावणे, उपशहराध्यक्ष मच्छिंद्र झगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags
पनवेल