डॉ खडबडे दांपत्याचा जपले माणुसकीचे नाते; गरीब गरजू मातेची केली विनामूल्य प्रसुती
डॉ खडबडे दांपत्याचा जपले माणुसकीचे नाते; गरीब गरजू मातेची केली विनामूल्य प्रसुती
पनवेल दि.०९ (वार्ताहर) : एका गरीब मातेची आपल्या यशोदा फर्टिलिटी आणि आयव्हीएफ केंद्रात मोफत प्रसूती करून डॉ.बाळासाहेब खडबडे आणि डॉ.स्नेहलता खडबडे या दांम्पत्याने एक प्रकारे माणुसकीचे नाते जपले. एकीकडे रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट असल्याच्या तक्रार येत असताना दुसरीकडे पैसे नसलेल्या एका गरोदर मातेला आणि तिच्या बाळाला खऱ्या अर्थाने मदतीचा हात देऊन खडबडे दाम्पत्यांनी बांधिलकी जपून आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे. अर्थात दिशा महिला व्यासपीठाचा समन्वय ही तितकाच महत्त्वाचा ठरला आहे.
           आजच्या घडीला खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शुल्क घेतले जाते. या ठिकाणचे उपचार सर्वसामान्यांना न परवडणारे असतात. पनवेल परिसरात उपजिल्हा रुग्णालय शिवाय एकही शासकीय प्रसूती गृह नाही. त्यामुळे गोरगरीब गरजू महिलांची परवड होते. कित्येकदा पैसे नसल्याने घरीच बाळंतपण केले जाते. त्यामुळे आई आणि बाळाच्या जीवाला एक प्रकारे धोका निर्माण होतो.
 दरम्यान दिशा महिला मंचने आयोजित केलेल्या नवदुर्गा सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमांमध्ये यशोदा फर्टिलिटी आणि आयव्हीएफ केंद्र गरजू महिलांना मोफत मातृत्व सेवा आणि उपचार देण्याची घोषणा डॉक्टर असलेल्या खडबडे दांपत्याने केली.यावर्षी गीत पाटील या भगिनीला मोफत प्रसुती सेवा देण्यात आली.गीतने 6 जून, 2023 रोजी रात्री 6:49 वाजता बाळाला जन्म दिला. शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ही प्रसूती केली. विशेष म्हणजे आई आणि बाळ सुखरूप आहेत.दिशाच्या संस्थापिका निलम आंधळे आणि उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी रुग्णालयात जाऊन गित व तिच्या बाळाच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याचबरोबर डॉक्टरांचे सुद्धा आभार मानले.


कोट - सामाजिक बांधिलकीला समर्पित राहून वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉ.बाळासाहेब खडबडे आणि त्यांच्या पत्नी डॉ.स्नेहलता खडबडे यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांनी गरीब कुटुंबातील महिलांना मोफत मातृत्व सेवा देण्याची ग्वाही दिशा व्यासपीठाला दिली. आणि तो शब्द त्यांनी खऱ्या अर्थाने पाळला आहे. दोन दिवसांपूर्वी गीत पाटील या भगिनीने यशोदा हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार मोफत रीत्या करण्यात आले. अशाच प्रकारे इतर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनीही समाजाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सेवा देण्यासाठी पुढे आले
 पाहिजे. 
थोडे नवीन जरा जुने