मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी अधिकराव पोळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनव युवक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला विशेष सत्कार

मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी अधिकराव पोळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनव युवक मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला विशेष सत्कारपनवेल दि. ०९ (संजय कदम) : पनवेलचे येथे वास्तव्यास असणारे पोलीस अधिकारी अधिकराव पोळ यांचा मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. त्यानिमित्त सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अभिनव युवक मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.       यावेळी अभिनव युवक मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष व मा नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांनी अधिकराव पोळ यांच्या पनवेल शहरातील पायोनियर विभागातील निवासस्थानी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. फोटो : अभिनव युवक मित्रमंडळातर्फे अधिकराव पोळ यांचा सत्कार
थोडे नवीन जरा जुने