पनवेल दि.२९(वार्ताहर): आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाची महत्वाचा सण आहे. यासनानिमित्त सर्वत्र दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
त्याअंतर्गत कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्था,(के,जी,पी) तलोजा येथे आषाधी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक संस्थेचे चेअरमन तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
Tags
पनवेल