पनवेल दि.२९(संजय कदम): मुसळधार पावसामुळे धोकादायक स्थितीत आलेले नारळाचे झाड माजी नगरसेवक तथा भाजचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाडण्यात आले आहे. याबदफदल परिसरातील रहिवाश्यांनी माजी नगरसेवक नितीन परील यांचे आभार मानले आहेत.
पनवेल मध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
या पावसामुळे शहरातील पटेल पार्क येथील श्रुष्टी सोसायटी जवळील नारळाचे झाड पूर्ण पणे पडायच्या स्थितीत आले होते. ही बाब तेथील रहिवाशी सूर्यकांत पंडित, प्रसाद म्हात्रे यांनी पानवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.
Tags
पनवेल