वंदे भारत ट्रेनची भेट; पनवेलमध्ये भाजपच्यावतीने जोरदार स्वागत

वंदे भारत ट्रेनची भेट; पनवेलमध्ये भाजपच्यावतीने जोरदार स्वागत 

पनवेल (प्रतिनिधी) देशवासीयांना एकाच दिवशी पाच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडगाव (गोवा) - मुंबई, भोपाळ-इंदौर, भोपाळ- जबलपूर, रांची- पाटणा आणि धारवाड-बंगळुरू अशा पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखविला.या सोहळ्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्ण
व, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासह देशातील वंदे भारत गाड्यांची संख्या आता एकूण २३ झाली आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत साकारण्यात आलेली ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे.
दरम्यान, मडगाव (गोवा) - मुंबई वंदे भारत रेल्वेगाडी पनवेल रेल्वेस्थानकावर मंगळवारी सायंकाळी ७. २० वाजता आल्यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी
, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आदींनी हिरवा झेंडा दाखवून स्वागत केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. ढोलताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत वंदे भारत ट्रेनचे जोरदार आणि उत्साहात स्वागत करण्यात आले. 


थोडे नवीन जरा जुने