कमधील २४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी निविदा
कमधील २४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी निविदा
पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या ११ इमारतीमधील २, ४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी ११ निविदा सादर झाल्या असून निविदा प्रक्रियेअंती तातडीने कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात येणार आहेत. त्यानंतर तात्काळ घरांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून ही कामे सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. परिणामी, पात्र विजेत्या गिरणी कामगारांना येत्या काही महिन्यांमध्ये आपल्या घराचा दाबा मिळू शकणार आहे.


मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील पनवेलमधील कोन येथील २, ४१७ घरांसाठी २०१६ मध्ये
सोडत काढण्यात आली होती. सोडतीनंतर मुंबई मंडळाने विजेत्या गिरणी कामगारांची पात्रता निश्चिती सुरू करून ८०० हून अधिक कामगारांकडून घरांची


रक्कमही भरून घेतली. मात्र या पात्र विजेत्यांना घरांचा ताबा मिळू शकलेला नाही. या घरांच्या दुरुस्तीवरून वाद सुरु झाल्याने ताबा रखडला होता. हा वाद
मिटवून मंडळाने ११ इमारतींच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र ११ पैकी केवळ तीनच इमारतींच्या दुरुस्तीच्या निविदांना प्रतिसाद मिळाला


होता. परिणामी, दुरुस्ती पुन्हा लांबणीवर पडली होती. त्यामुळे मंडळाने पुन्हा आठ इमारतींच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या, अखेर या आठ इमारतीच्या
दुरुस्तीच्या कामासाठी प्रतिसाद मिळाला आणि आता या निविदा प्रक्रियेला अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १० ते १२ दिवसात कंत्राटदारांना


कार्यादेश देण्यात येतील, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कार्यादिश दिल्यानंतर तात्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात
येणार आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.


थोडे नवीन जरा जुने