धरण क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याच्या नवीन साठ्याची निर्मिती झाली नसल्याने सिडको महामंडळातर्फे सिडको अधिकार क्षेत्रातील नोड आणि गावांत पाणी कपात जाहिर करण्यात आली आहे. या दरम्यान नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे. सध्या धरणात ३ महिने पुरेल एवढाच पाणी साठा उपलब्ध असल्याने पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी उद्या बुधवार, दिनांक २८ जून २०२३ पासून सिडकोतर्फे आपल्या अधिकार क्षेत्रात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
सिडकोतर्फे सिडको अधिकार क्षेत्रातील विविध नोड, गावे आणि हेटवणे पाणी पुरवठा योजना जलवाहिनी मार्गावरील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. सिडकोचे हेटवणे धरण, नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, एमआयडीसीचे बारवी धरण आणि मजीप्राचे पाताळगंगा धरण या जलस्रोतांद्वारे सिडकोकडून पाणी पुरवठा करण्यात येतो
. परंतु उपरोक्त धरण क्षेत्रांतदेखील अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याचा नवीन साठा तयार झाला नसल्याने या सर्व प्राधिकरणांनीही पाणी कपात जाहीर केली आहे. सिडकोतर्फे उपलब्ध पाणी साठ्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असून त्यानुसार भविष्यातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करत सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
Tags
पनवेल