पनवेल दि.२८ (संजय कदम) : पनवेल शहर पोलिस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचा वाढदिवस पनवेल शहर पोलीस ठाण्यात केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच वाढदिवसानिमित्त विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags
पनवेल