पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह






पनवेल परिसरात आढळला अनोळखी मृतदेह
पनवेल दि.२८ (संजय कदम) : पनवेल शहरातील पनवेल वाईन शॉपच्या बाजुला एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. पनवेल शहर पोलीस सादर इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. 



                सदर इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे असून तो रंगाने सावळा, उंची ५ फुट ६ इंच, केस काळे, चेहरा उभट, मिशा दाढी तसेच अंगात हाफ बाहयाचा गुलाबी टी शर्ट व गडद चॉकलेटी रंगाची हाफ पॅन्ट असा पेहराव घातला आहे. सदर इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाइकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक एन. एन. जगदाळे यांच्याशी संपर्क साधावा. 


थोडे नवीन जरा जुने