लक्षात ठेवा पर्यटनस्थळांवर तुमची एक चुक तुमच्या जीवावर बेतू शकते
लक्षात ठेवा पर्यटनस्थळांवर तुमची एक चुक
तुमच्या जीवावर बेतू शकते 
पर्यटनस्थळांवर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी तालुका पोलिसांचे सूचनाफलक 

मर्म दृष्टी वृत्तपत्र & डिजिटल न्यूज 
संजय कदम _ वरिष्ठ पत्रकार 
पनवेल दि.२९ पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण पर्यटन प्रेमींना खुणावत आहेत, वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात, मात्र पनवेल जवळ असलेले करंबेळी, कोंडले, मोर्बे येथे पर्यटकांनी जाऊन जीवितहानी होऊ नये म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षेचे अनुषंगाने सुचना, मनाई आदेश याचे सुचना फलक लावले आहेत. सततच्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल तालुक्यातील नदी, नाले, तलाव, धरणे, बंधारे, ओसंडून वाहत आहेत. सर्व डोंगर, माळरान, शेती हिरवीगार झाली आहे. वर्षासहलीसाठी जाणार्यांना ही स्थळे भुरळ घालत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात येण्यासाठी येथील वातावरण साद घालीत आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी आनंदित असतात. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल येथील पर्यटक प्रचंड गर्दी करीत असतात. काही जण पोलिसांची नजर चुकवून येथील धबधबे, नाले यात उतरत असतात, पण त्यांना पाण्याचा अंदाज मिळत नसल्याने जीवितहानी होते. असे कोणतेही प्रकार घडू नयेत म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षेचे अनुषंगाने सुचना, मनाई आदेश याचे सुचना फलक लावले आहेत. तसेच पोलिसांचे सूचना तसेच आदेश पाळण्याचे आवाहन पर्यटकांना केले आहेत.


थोडे नवीन जरा जुने