पनवेल(प्रतिनिधी) टाटा पॉवर आणि एला फाउंडेशनने जैववैविध्यावर आधारित पुस्तकांच्या मालिकेत ‘माहसीर कॉन्झर्व्हेशन – अ सागा ऑफ सक्सेस, टाटा पॉवर लेगसी (१९७०-२०२१)’ हे पुस्तक समाविष्ट करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. या पुस्तकात माहसीर माशाचा संपूर्ण जीवनक्रम फोटोंच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. हे पुस्तक एक महत्त्वाचा टप्पा असून त्यात
माहसीरसारख्या ‘गोड्या पाण्यातील वाघ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माशाचे लक्षवेधी आयुष्य दाखवण्यात आले आहे. माहसीर मासा आययूसीएनतर्फे (इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) लुप्त होत असलेली प्रजाती म्हणून जाहीर करण्यात आला आहे. ‘अॅक्ट फॉर माहसीर’ या ५० वर्ष जुन्या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ब्लूफिन माहसीरची जात आता आयसीयूएनच्या लुप्त होत असलेल्या प्रजातींच्या यादीतून वगळ्यात आली आहे. यातून कंपनी नैसर्गिक वैविध्य जपण्यासाठी किती बांधील आहे हे दिसून आले आहे.
हे पुस्तक जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तान खोपोलीत लाँच करण्यात आले. यावेळी श्री. प्रवीण (आयएफएस) प्रमुखवनसंरक्षक- पुणे यांच्यासह टाटा पॉवरचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. विजय नामजोशी- प्रमुख जनरेशन, पराग राईलकर, प्रमुख- सिव्हिल, इस्टेट, प्रभाकर काळे- प्रमुख हायड्रोज आणि डॉ. सतीश पांडे, एला फाउंडेशनचे संचालक व पुस्तकाचे प्रकाशक हे सन्माननीय पाहुणे यावेळी उपस्थित होते. या पुस्तकात माहसीरच्या आयुष्याचे सखोल चित्रण उलगडण्यात आले आहे.
लहान पिल्लू ते पूर्ण वाढ झालेला मासा असा त्याचा प्रवास टप्प्याटप्प्याने यात फोटोंच्या स्वरुपात पाहायला मिळतो. या पुस्तकात संवर्धनाचे पुरातत्वशास्त्रीय पैलू, भारतीय आणि जागतिक संस्कृतीमधील माहसीरचे सांस्कृतिक महत्त्व, टॅक्सोनॉमी, भ्रूणशास्त्र आकर्षक फोटोंच्या रुपात मांडण्यात आले आहे. सध्या या माशाला असलेले धोके तसेच माहसीर मासेमारीचा खेळ याची माहितीही यात देण्यात आली आहे.
Tags
पनवेल