युथ रिपब्लिकन व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष प्रणेते,पँथर मनोज भाई संसारे यांची जाहीर अभिवादन सभा कामोठे येथे आशिष कदम यांच्या पुढाकाराने संपन्न.


युथ रिपब्लिकन व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष प्रणेते,पँथर मनोज भाई संसारे यांची जाहीर अभिवादन सभा कामोठे येथे आशिष कदम यांच्या पुढाकाराने संपन्न.कामोठ्यातील तमाम आंबेडकरी चळवळीतील पक्ष,संघटना, बौद्धजन पंचायत समितीच्या सर्व शाखा,भारतीय बौद्ध महासभा,सामाजिक संस्था,मित्र मंडळ व सर्वं भिम अनुयायी यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील
युथ रिपब्लिकन व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष प्रणेते,पँथर...
मा.मनोज भाई संसारेयांची जाहीर अभिवादन सभा रविवार दिनांक ११ जून २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवातीलाच उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विठोबा दादा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तर अनुमोदन विनोद गमरे यांनी दिले.
तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.यानंतर कार्यक्रमाचे निमंत्रक कामोठे आरपीआयचे युवा अध्यक्ष आयु. आशिष आत्माराम कदम यांनी प्रस्तावना सादर करत पँथर मनोज भाई संसारे यांच्या जीवनावर वैचारिक प्रकाश टाकला.या दरम्यान अनेक उपस्थित कार्यकर्त्यांनी मा. मनोज भाई संसारे यांच्या बद्दल च्या अनेक आठवणी, त्यांचे हिमालया सारखे कार्य,आपल्या शब्दात व्यक्त करताना गहिवरून गेले.


या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. सागर भाई संसारे यांची लाभली. भाई बद्दलचे अनेक प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होते. पण ते शब्दात व्यक्त होत नव्हते..डोळे आणि मन भरून आले होते. त्यांच्यातील भावनिकता सहज दिसुन आली होती.


या कार्यक्रमाला युवा सरचिटणीस अभिजित कांबळे व युवा पँथर अतुल भाई खरात,सम्यक बहुउद्देशीय सा. संस्था कामोठे यांचे अनेक पदाधिकारी, संस्थापक सदस्य आत्माराम कदम,सुनिल कदम,मंगेश मोहिते,जयेंद्र कांबळे, विलास नांगरे, विनोद जाधव, यांच्यासह कामोठे रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष मंगेश धिवार,पनवेल तालुका कार्याध्यक्ष आयु.अनिल जाधव, कामोठे सरचिटणीस आयु गौतम कांबळे, पनवेल सरचिटणीस आयु.प्रभू जाधव,नालंदा बुद्धविहरचे अध्यक्ष आयु रवींद्र कांबळे, कार्याध्यक्ष आयु सुनिल जोगदंड,बामसेफ संघटनेचे 


आयू. मनोज महाले,भीम आर्मी चे शुद्धोधन कांबळे, युवा कार्यकर्ते सचिन गायकवाड,आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आयु महेश साळुंखे,मुंबईतील जेष्ठ नेते विजयजी पवार साहेब, व चळवळीतील अनेक कार्यकर्ते या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करत अभिवादन केले.
अध्यक्षीय भाषणात कामगार नेते विठोबा दादा पवार यांनी मौलीक विचार मांडले व मुक श्रध्दांजली अर्पण करून शेवटची सरनेत्ते घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल जाधव यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने