कळंबोलीत १७ लाखांची विजचोरीकळंबोलीत १७ लाखांची विजचोरी

कळंबोलीतील दोन रो हाऊसमध्ये वीज महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने तपासणी केल्यावर तब्बल १७ लाख ८० हजार ४३० रुपयांची वीज चोरी आढळली. याबाबत सोमवारी भारतीय विद्युत अधिनियम कायद्याअंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्यात रो हाऊसमधील वीज ग्राहकांवर गुन्हा नोंदविला आहे.५ जूनला वाशी येथील वीज महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता कपील गाठले यांच्या भरारी पथकाने कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १४ येथील ए-५३ आणि सेक्टर १३ मधील ए-१५ या दोन रो हाऊसमधील वीज मीटर जोडणी तपासणी केल्यावर त्यांना विजमीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळले.


 तपासणी करणा-या पथकाला वीज मीटरमधील रिडींग व्यवस्थित वाचता येऊ नये अशी स्थिती निर्माण करण्यात आली होती. तपासणी करणाऱ्या पथकाने पाच बीज मीटर ताब्यात घेतले असून याबाबत फौजदारी कार्यवाही से हाऊस मालकांविरोधात केली.


थोडे नवीन जरा जुने