मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टँकरला आग





मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टँकरला आग

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एका केमिकल टैंकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो रस्ता दुभाजकाला धडकला. यामध्ये



केमिकलने पेट घेतल्याने संपूर्ण टैंकर जळून खाक झाला आहे. तर पेटत्या टँकरमधून केमीकल व आगीचे लोट पुलाच्या खाली पडले व केमिकलने पेट घेतला आहे. या घटनेत एकूण चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत पुलाच्या खाली व पुलाच्या वर दोन्हीकडे आगीचे मोठमोठे लोट उसळले होते. आगीची माहिती समजताच लोणावळा शहर पोलीस, खंडाळा महामार्ग पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा व इतर सामाजिक संघटनांचे सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेतली.



अग्नीशमन दलाची पथके देखील घटनास्थळी दाखल झाली व आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु

झाले. त्यातच पाऊस देखील आल्याने आग विझविण्यास मदत झाली. अतिशय भयंकर अशी ही घटना असून संपूर्ण परिसरास आगीचे लोट पहायला

मिळत होते. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस वे बंद करण्यात आला होता. दरम्यान दुपारी दिडनंतर आग नियंत्रणात आल्यानंतर पुण्याच्या

दिशेने जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली होती. अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे व मुंबई पुणे राष्ट्री य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवाशी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत



आहे.

जखमीवर सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोणावळा विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व महामार्गच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहिती घेतली. नागरिक देखील मोठ्या संख्येने जमले होते. मयत व्यक्तीपैकी दोन जण कुणेगाव येथील स्थानिक असून उर्वरित दोन जण टँकरमधील आहेत.



या संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. 'मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ३ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरु होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे, असं ट्विट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.


थोडे नवीन जरा जुने