माजी सरपंच लक्ष्मण सदानंद ठाकूर यांच्याकडून रा.जि.प.शाळा भेंडखळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप.माजी सरपंच लक्ष्मण सदानंद ठाकूर यांच्याकडून रा.जि.प.शाळा भेंडखळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप.
        उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )लक्ष्मण सदानंद ठाकूर माजी सरपंच यांच्या कडून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडखळ येथे शाळेतील सर्व मुलांना शैक्षणि साहित्याचे वाटप करण्यात आले. ते 2010 पासून दरवर्षी मुलांना साहित्य वाटप करतात.गरीब गरजू मुलांना प्रोत्साहण मिळावे,त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून ते शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात.          या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला स्वत: भेंडखळचे माजी सरपंच लक्ष्मण ठाकूर हजर होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भेंडखळ ग्रामपंचायतचे सरपंच मंजिता मिलिंद पाटील , उपसरपंच संगीता मेघश्याम भगत,ग्रामपंचायत सदस्य अभिजीत ठाकूर, दिपक ठाकूर, अजित ठाकूर, अक्षता ठाकूर, स्वाती पाटील हे उपस्थित होतेे. शाळा व्यवस्थापन सदस्या रोशनी ठाकूर, सपना राऊत, दिपाली जैसवाल या हजर होत्या. शाळेचे मुख्याध्यापक प्रविण पाटील, शिक्षिका माधवी पाटील, प्रियांका घरत, विजया भगत हजर होत्या. प्रास्ताविक अनुरथ पाटील यांनी केले. सर्व मान्यवारांचे आभार विकास पाटील यांनी मानले.


थोडे नवीन जरा जुने