पनवेल दि २४( संजय कदम) : पनवेल महानगर पालिका शहर परिसरात पथदिव्यांवर एलईडी बसविण्याचे काम सध्या सुरु आहे परंतु ते काम संथ गतीने सुरु असल्याने सदर कामात वेग आणावा अशी मागणी पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शेकापचे पनवेल महापालिका क्षेत्र कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, खांदा कॉलनी शहर व परिसरातील पथदिवे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून सिडको त्यांची देखभाल व दुरुस्ती करत आहे. पनवेल महापालिका २०१६ साली स्थापन झाली तरीही सहा वर्षांपासून सिडको च त्याची देखभाल करत होती २०२३ या चालू वर्षी पायाभूत सोयी सुविधा सिडको कडून पनवेल महापालिकेकडे हस्तांतर झाल्या आहेत. सिडकोने स्ट्रीट लाईट वर सोडियमचे दिवे लावलेले होते त्याचा जास्त उजेड पडत नसल्याने अनेक गैर प्रकाराला वाव मिळत होता नागरिक अंधारात चाचपडत चालत होते.
पनवेल महानगर पालिकेने संपूर्ण क्षेत्रात एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दिवे बसविण्याचे काम हि सुरु केले आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावात हि देवे बसविले आहेत. शहरी भाग व गार्डन अजून ही अंधारात च आहे तरी या परिसरात लवकरात लवकर दिवे बसविण्यात यावे अशी मागणी परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व शेकापचे पनवेल महापालिका क्षेत्र कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केले आहे.
Tags
पनवेल