चक्री वादळामुळे बत्ती गुल, तळवली दांड वाडीतील घरांचे व समाजमंदिर यांचे मोठे नुकसान
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा ५ जून,
काल झालेल्या चक्री वादळाने नागरिक चांगलेच हादरले असून या चक्री वादळामुळे तळवली दांड वाडी येथिल सात घरांचे व समाजमंदिर यांचे मोठे नुकसान झाले.ही बाब निदर्शनास येताच तळवली येथिल सामाजिक कार्यकर्ते अतुल मालकर यांनी तातडीने या वाडीमध्ये भेट देवून पंचनामे करावयास सांगितल्यांने.या वादळांची तीव्रता खूप असल्यामुळे घराचे कौल,तसेच पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यांचे पहावयास मिळाले. यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे.त्याच बरोबर काही ठिकाणी बत्ती गुल झाल्यांचे चित्र निर्माण झाले आहे.
घर बांधताना प्रत्येकांनी पैश्याची थोडी बचत करुन घर बांधले. मात्र चक्रीवादळाने सर्व काही हिरावून घेतले आहे. कोरोना सारख्या संकटातून सावरत असतांना चक्री वादळाने दिलेल्या तडाक्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे.मात्र पंचनामे करुन सुद्धा हवी तेवढी रक्कम मिळतच नाही.जून महिन्यातील पहिला पाऊस हा नागरिकांच्या मुळावर उठत असल्याचे चित्र दर वर्षी पहावयास मिळत असते.मात्र असे असले तरी सुद्धा निसर्गाच्या या चक्रला कोणीही थांबवू शकत नसल्यामुळे प्रत्येक जण त्यांच्या पुढे हतबल होत आहे.
या चक्री वादळामुळे दत्तु कमळ्या वाघे,रामदास अर्जुन पवार ,शंकर ,चंदर पवार,सखाराम गोविंद जाधव,मंजुळा गणेश कातकरी,लक्ष्मी विठोबा जाधव,हर्षदा राकेश जाधव या घरांचे तसेच समाज मंदिर यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचानामे करण्यात आले.असून नुकसान भरपाई कधी मिळेल याकडे या कुटुंबाचे लक्ष लागले आहे.
Tags
पाताळगंगा