पावसाचे लवकर आगमन होण्यासाठी वरुण राजाकडे बळीराजाचे साकडे

पावसाचे लवकर आगमन होण्यासाठी वरुण राजाकडे बळीराजाचे साकडे
पनवेल दि. ११ ( वार्ताहर ) : उन्हाचा दाह वाढत चालला असून अधुन मधून ढगाळ वातावरण शेतकऱ्यास लवकर पाऊस येण्याचे संकेत देत आहे. याचीच प्रचीती म्हणून नुकतेच तुरळक पावसाचे आगमन झाले. यामुळे पावसाचे लवकर आगमन होण्यासाठी वरुण राजाकडे बळीराजास साकडे घालीत आहेत . कारण अशा ढगाळ वातावरणामुळे पावसाचे आगमन लवकर होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे


                  दरवर्षी शेतकरी शेती करीत करीत असल्यामुळे पावसाच्या आगमनाचे काही काही हालचाली शेतकरी जाणत असतो. मागील वर्षी अशा वातावरणात कधी पाऊस तर कधी उन पडत असल्याने चालु वर्षी मात्र शेतकर्यांना मोठय़ा पावसाच्या आशा लागली असून काही शेतकरी ढगाळ वातावरणामुळे शेतीच्या कामात मग्न झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. चालू वर्षी तरी पावसाने चांगली साथ द्यावी असे साकडे शेतकरी वरून राजाकडे करीत आहे. ढगाळ वातावरणामुळे आकाशात पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पावसाचे आगमन मोठ्याप्रमाणावर होत नसल्यामुळे शेतकरी चिंता ग्रस्त झाले आहे.
 आकाशात ढग निर्माण होत असले तरी सुद्धा सर्वच ठिकाणी पाऊस पडतच असतो असे नाही उन्हामुळे शेतामध्ये असलेले पाणी निघून जात असल्यामुळे दुबारा पेरणीचे सावट निर्माण होवू नये यासाठी शेतकरी त्या वरुणराजाकडे प्रार्थना करीत आहे.


थोडे नवीन जरा जुने