अनधिकृत शाळांवर तत्काळ कारवाई करण्याची राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची मागणी





अनधिकृत शाळांवर तत्काळ कारवाई करण्याची राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची मागणी 
पनवेल दि. ११ ( वार्ताहर ) :रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागाने पनवेल परिसरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे.करंजाडे मधील सहा शाळांचा यामध्ये समावेश आहे.अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे रंजीत नरुटे यांनी केली आहे.



                    या सहा शाळांमध्ये वेदिक ट्री प्री स्कुल,वेद ड्रयाप पब्लिक स्कुल,डॉल्फिन किड्स स्कुल,सेंट अँथनी इंग्लिश स्कुल,एस जी टी इंटरनॅशनल स्कुल,वेदगृह इंटरनॅशनल स्कुल आदींचा समावेश आहे.या शाळांमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांसह पालकांची फसवणूक होण्याची शक्यता


 असल्याने याबाबत शिक्षण विभागाने तत्काळ कारवाईची मागणी शिक्षणाधिकारी तसेच स्थानिक पोलिसांकडे केली आहे.याबाबत पनवेल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी एस मोहिते व पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना निवेदन दिले आहे.यावेळी रंजित नरुटे यांच्यासह राजू नलावडे, ओमकार जाधव, आदित्य साळवी, प्रथमेश मोडवे आदि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने