शिवाजीनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य जलकुंभ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजनशिवाजीनगरमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य जलकुंभ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन 


पनवेल(प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील ग्रामस्थांना आणि विषेश करुन महिलांना पाण्याची समस्या उद्भवू नये या करीता नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शिवजीनगर ग्रामस्थांच्या माध्यमातून हे जलकुंभ बांधण्यात येणार आहे. या जलकुंभाच्या कामाचे भुमीपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि अमोघ प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते बुधवारी झाले.


 शिवजीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानात हे जलकुंभ उभारण्यात येणार आहे. यामध्ये खालची पाण्याची टाकी १ लाख ८० हजार लीटची तर वरची टाकी ८० हजार लिटरची असणार आहे. या भुमीपूजनावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, उपाध्यक्ष व्ही. के. ठाकूर, जयवंत देशमुख, मोतीलाल कोळी, स्वप्नील ठाकूर, साईचरण म्हात्रे, पी.के.ठाकूर, टी. के. ठाकूर, शनिदास ठाकूर, किशोर ठाकूर, नंदा ठाकूर, शोभा ठाकूर, रणजित ठाकूर, सुरेश ठाकूर, सुनील ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, बाळकृष्ण ठाकूर, अमित कडू, हरजीवन ठाकूर, शुभांगी ठाकूर, वंदना ठाकूर, आशा म्हात्रे, शैला ठाकूर, गीता ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने