चोरीची मोटर सायकल वापरुन महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे जबरीने खेचुन नेणा-या चोरटयांना गुन्हे शाखा कक्ष ०२, पनवेल यांनी केले जेरबंदचोरीची मोटर सायकल वापरुन महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे जबरीने खेचुन नेणा-या चोरटयांना गुन्हे शाखा कक्ष ०२, पनवेल यांनी केले जेरबंद
पनवेल दि.१५(संजय कदम):  चोरीची मोटर सायकल वापरुन महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे जबरीने खेचुन नेणा-या चोरटयांना गुन्हे शाखा कक्ष ०२, पनवेल यांनी केले जेरबंद केले आहे. तसेच एका आरोपींकडून ५० हजार रुपये किमतीचे १२ ग्राम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे.
     नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हदिदमध्ये काही अज्ञात आरोपी हे मोटर सायकल वरून येवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे किंमती व मौल्यवान दागिणे जबरीने खेचुन चोरी करून घेवून जात असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल आहेत. नागरीकांसाठी सोन्याचे दागिणे हा भावनिक विषय असतो. आरोपींनी अशा प्रकारे सोन्याचे दागिणे जबरीने खेचुन नेणे अशा गंभीर गुन्हयांची तात्काळ उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त  (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे, विनायक वस्त, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी आदेशीत केले होते. अशा प्रकारचे गुन्हयांमध्ये आरोपी हे त्यांच्याकडील मोटर सायकल वरून अचानक येवून क्षणाचा ही विलंब न घालविता महिलांचे गळयातील सोन्याचे दागिणे जबरीने खेचुन नेत असल्याने अशा आरोपींबाबत फिर्यादी व साक्षीदारांकडे विचारपुस करताना खुप मर्यादा येतात. त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणने पोलीसांना अतिशय आव्हानात्मक होते. सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रविंद्र वि. पाटील, गुन्हे शाखा कक्ष २, पनवेल, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नवी मुंबई, ठाणे, मुंबई तसेच मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली
. घडलेल्या गुन्हयांचे घटनास्थळी जावून फिर्यादी, साक्षीदार यांना भेटुन तसेच घटनास्थळावरील प्राप्त सीसीटिव्ही फुटेजचे सखोल तपासणी करून आरोपींबाबत जास्तीत जास्त माहिती संकलीत करून अशा प्रकारचे गुन्हे करणारी काही ठराविक आरोपींची टोळी सक्रिय झाली असल्याची खात्री केली. गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलच्या पथकाने गुन्हा घडल्याची वेळ, घटनास्थळी आरोपी येण्याजाण्याचा मार्गावरील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी तसेच गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करून गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे पोउपनि मानसिंग पाटील व पथकाने कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील आरोपीना अटक केले. 
केवीन उर्फ मोहम्मद सादक जाफरी (वय २१ ) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात ५० हजार रूपये किंमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करून चेन स्नॅचिंगच व मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच पथकाने रबाळे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील आरोपी हाथी उर्फ कैलास कमलबहाद्दूर नेपाळी, (वय २४ वर्षे) यांच्याबाबत गोपनिय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त करून त्याचेवर सतत निगराणी ठेवून सापळा रचुन त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे केलेल्या सखोल चौकशीत चेन स्नॅचिंगचे व मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची उल्लेखनिय कामगिरी गुन्हे शाखा कक्ष ०२, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संदिप गायकवाड, प्रविण फडतरे, पोलिस उप निरीक्षक मानसिंग पाटील, वैभव रोंगे, पो. हवा. तुकाराम सूर्यवंशी, दिपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पवार, अनिल पाटील, अजित पाटील, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, पो.शि. संजय पाटील, विक्रांत माळी यांनी केली आहे.


थोडे नवीन जरा जुने