शेतकरी कामगार पक्षातर्फे १० वी आणि १२ वी परीक्षांतील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा करण्यात येणार भव्य सत्कार
शेतकरी कामगार पक्षातर्फे १० वी आणि १२ वी परीक्षांतील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा करण्यात येणार भव्य सत्कार

सुप्रसिद्ध करियर गायडन्स एक्स्पर्ट यशवंत गोसावी करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

        शेतकरी कामगार पक्षाचे वतीने रविवार दिनांक १८ जून रोजी येथील वीरुपाक्ष मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहामध्ये १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध करियर गायडन्स एक्सपर्ट यशवंत गोसावी हे उपस्थित विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी नंतरच्या शिक्षणामध्ये असलेल्या अनेक ज्ञात आणि अज्ञात पर्यायांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.


            दहावी आणि बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये मैलाचे दगड असतात. म्हणूनच अपार मेहनत करून नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे काम शेतकरी कामगार पक्ष सातत्याने करत आलेला आहे. नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची परंपरा जवळपास गेले तीन दशकांहून अधिक वर्षे शेकाप जोपासत आलेला आहे. हे सारे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत, उच्च शिक्षणाचा पर्याय निवडताना त्यांना प्रोत्साहित करणे हे आपले परमकर्तव्य समजून शेतकरी कामगार पक्ष नित्यक्रमाने दरवर्षी भव्य सत्काराचे आयोजन करत असतो.        यंदाचे वर्षी पनवेलच्या रत्नाकर खरे मार्गावरील वीरूपाक्ष मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात सत्कार समारंभ पार पडणार आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध करियर गायडन्स एक्सपर्ट यशवंत गोसावी हे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. उत्कृष्ट प्रतीचे पेन,आकर्षक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि दहावी बारावीनंतरच्या शैक्षणिक पर्यायांचे पुस्तक देऊन नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पनवेल परिसरातील शाळा आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुलांचा या समारंभात सन्मान करण्यात येणार आहे. ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या समारंभामध्ये गौरविण्यात येणार असल्याचे समजते.


थोडे नवीन जरा जुने