सोनसाखळी, मोबाईल, मोटार सायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास मानपाडा पोलिसांकडून अटक; १३ गुन्हे उघडकीस
पनवेल दि.१६ (संजय कदम) : ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल २१ गुन्हे दाखल असलेल्या सराईत सोनसाखळी, मोबाईल जबरी चोरी, मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८ मोटार सायकली, ५ मोबाईल फोन असा एकुण ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यांत आला आहे. त्याच्या साथीदाराचा शोध मानपाडा पोलीस घेत आहेत.
डोंबिवली परिसरात राहणारे शरद कडुकर हे पायी चालत जात असताना अज्ञात चोरट्याने पाठीमागून येवुन त्यांचे हातातील मोबाईल फोन चोरी करून नेला होता. याबाबतची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यांत दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनिल तारमळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा राजकुमार खिलारे, शिरीष पाटील, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, पोना यल्लापा पाटील, देवा पवार, पोशि अशोक आहेर,
विजय आव्हाड, महेद्र मंझा आदींची वेगवेगळया टिम तयार करण्यात आली. गुप्त बातमीदार तसेच आरोपीताच्या वर्णनानुसार शोध घेत असताना गुप्त बातमी वरून सदर आरोपी कल्याण शहाड भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी (वय २४, रा.अंबिवली) हा मोटार सायकल घेण्यासाठी शहाड रेल्वे स्टेशन परिसरात आला असता त्याला जागीच पकडुन चौकशी केली असता त्यांने गुन्हयांची कबुली दिली. सदर आरोपीकडुन ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८ मोटार सायकली, ५ मोबाईल फोन असा एकुण ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल मानपाडा पोलिसांनी जप्त केले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे.
Tags
पनवेल