उरण विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठे खिंडार.

उरण विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठे खिंडार.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार इनकमिंग


माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 400 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी उरण मतदार संघातील खालापूर तालुक्यातील मराठा महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष व भाजपचे दिग्गज नेते उत्तमशेठ भोईर आपल्या चारशे कार्यकर्त्यांसह तसेच माजी सरपंच संदेश जाधव, माजी उपसरपंच अमित मांडे, किशोर शिंदे, भाग्यश्री पवार, निखिल मोरे, दीपिका भंडारकर,किशोर शिंदे गजानन पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात प्रवेश केल्याने उरण मतदार संघामध्ये भाजपला मोठे खिंडार पडले असून शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे, सदर वेळी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले की, उरण विधानसभेतील पुढचा आमदार हा शिवसेनेचा असून मनोहरशेठ भोईर हे मोठ्या फरकाने विजय होतील आमदार नसतानाही त्यांनी कामाचा झपाटा लावलेला आहे 


तो अतिशय गौरवण्यासारखा आहे, वेळ पडली तर त्यांच्या प्रचाराला मी सुद्धा उरण मतदार संघामध्ये येईन असे त्यांनी आश्वासन दिले व भारतीय जनता पार्टी व शिंदे गटातील आमदारांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला तसेच उपनेत्या ज्योतीताई ठाकरे म्हणाल्या की उरण विधानसभा मतदारसंघातील मनोहरशेठ भोईर यांच्या सारखा साधा आणि स्वच्छ मनाचा माणूस त्यांचा पराभव होतोय ही खंत आजही वाटतोय, मी त्यांना खूप पूर्वीपासून ओळखतोय त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला परिचय आहे त्यांच्या कामाचा झपाटा मी खूप जवळून पाहिलेले आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनोहरशेठ भोईर यांना निवडून आणून त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवा असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले,
 सदर वेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, मी आमदार असो किंवा नसो समाजाची बांधिलकी लक्षात घेऊन जनतेची काम करत राहीन ,आमदार नसताना सुद्धा जवळजवळ 70 ते 80 कोटीची काम मी या मतदारसंघांमध्ये केलेली आहेत त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या कामाची पोचपावती 2024 च्या निवडणुकीमध्ये उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य जनता देईल असा त्यांनी आशावाद व्यक्त केला, या कार्यक्रमात जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, कर्जत विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनीही आपले मनोगते व्यक्त केली.सदर कार्यक्रमाला कर्जत उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथशेठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी सभापती श्यामबाई साळवी, रमेश पाटील, सुरेश म्हात्रे, अजू सावंत, एकनाथ मते नीलम पाटील, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उप तालुका संघटक के एम घरत, सुधीर पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड,उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, प्रीती कडव, शैला भगत, हुसेना शेख उपजिल्हाधिकारी अवचित राऊत,निखिल पाटील, प्रशांत खांडेकर, महेश पाटील, ऍड संपत हडप, मनोहर देशमुख,नितीन तळवे,संतोष पंगत, बंटी नलावडे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने