शिवछत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने महेंद्र घरत यांनी तब्बल 1050 महिलांना घडविले राजधानी रायगडचे दर्शन.






शिवछत्रपतींच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने महेंद्र घरत यांनी तब्बल 1050 महिलांना घडविले राजधानी रायगडचे दर्शन.




उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे रीस, खालापूर येथे मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी शिवव्याख्याते प्रशांतजी देशमुख यांनी उपस्थितांना शिवव्याख्यानातून शिवचरित्राची ओळख करून दिली. व्याख्यानानंतर आपले मनोगत व्यक्त करताना प्रशांत देशमुख यांनी समोर बसलेल्या शेकडो महिलांना आपण छत्रपतींचे जीवन चरित्र तर ऐकलेत परंतु आपणापैकी किती महिलांनी रायगड किल्ला पाहिलाय ? असा प्रश्न विचारला असता समोर बसलेल्या महिलांपैकी एकीचाही हात वर आला नाही.




 कोणीही रायगड किल्ला बघितलेला नव्हता.रायगड जिल्ह्याच्या रहिवासी, सासुरवाशिन, माहेरवाशिन असूनही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी पाहिली नाही हे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या लक्षात येताच त्यांना आश्चर्य वाटले. ज्या छत्रपतींच्या नावाने महाराष्ट्रातील सर्व पक्ष राजकारण करत मतांचा जोगवा मागत असतात. संपूर्ण हिंदुस्थानातून लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर येऊन नतमस्तक होतात मात्र त्याच रायगड जिल्ह्यातील लेकी सुना मात्र रायगडचा दर्शन घेत नाही, 



याची खंत वाटली व लगेचच कामगार नेते महेंद्र घरत यांनी जाहीर केले की आपण सर्व माय भगिनींना मोफत रायगड दर्शन घडविणार आज तो योग दिवस उजाडला. 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून तब्बल 1050 महिला, लेकी सुनांना रायगड दर्शन घडविले.राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची आणि रोपवे ची तिकिटाची सर्व व्यवस्था करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज 1 दिवस अगोदर तिथे उपस्थित होती.



 तब्बल 22 बस 125 किमी चा अंतर कापत चार तास प्रवास करत रायगड किल्ल्यावर हजारोंच्या संख्येने पावसाची तमा न बाळगता महिला भगिनींना शिवछत्रपतींच्या रायगडचे दर्शनाचे सफर घडवून आणली. काही महिला आपल्या लहान मुलांना सुद्धा घेऊन रायगड किल्ला पाण्यासाठी आलेल्या होत्या.शिवछत्रपतींच्या रायगडाचे विलोभनीय दर्शन सफर आखली त्यासोबत शिवव्याख्याते प्रशांतजी देशमुख यांच्या जय शिवराय या छत्रपतींच्या जीवनावर आधारित पुस्तकाची प्रत प्रत्येक महिलेस सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी शिवव्याख्याते प्रशांतजी देशमुख यांचे व्याख्यान तसेच संघटनेच्या माध्यमातून मनावरचे ताण कमी करण्यासाठी पुण्याहून आलेल्या अनुराधा उरसळ यांनी महिला वर्गाला स्ट्रेस मॅनेजमेंट चे मार्गदर्शन केले. 



आजच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या जीवनात महिलांना स्वावलंबी बनने काळाची गरज आहे. त्या दृष्टीने कामगार नेते महेंद्र घरत यांनी एक पाऊल पुढे टाकले असून महेंद्र घरत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकूणच जिजाऊंच्या लेकींना जणू शिव प्रभूंच्या विचारांच्या अमृतजलाची चव वर्षा ऋतूत वाटप करून शिवछत्रपतींच्या भेटीची आस तृप्त करण्यात आली व दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात नेहमीप्रमाणे महेंद्र घरत यशस्वी झाले.





म्हणून दिलेल्या शब्दाला पाळणारा आणि वचनाला जागणारा नेत्याचे अर्थात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे सर्व महिलांनी आभार मानून त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कामगिरीला यश मिळावं हे साकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना घातले.


थोडे नवीन जरा जुने