महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आजिवली येथे रस्ते सुरक्षा अभियान व जन जागृती मोहीम या विषयावर प्रबोधन


महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आजिवली येथे रस्ते सुरक्षा अभियान व जन जागृती मोहीम या विषयावर प्रबोधन
पनवेल दि.२६(संजय कदम): महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये वाहनचालक निष्कजीपण हा एक अपघातांमागील प्रमुख  कारण आहे. त्यामुळे वाहन चालवताना कोणकोणते सुरकसेहचे उपाय महत्वाचे आहे.यासंदर्भात आजिवली येथील  जनता माध्यमिक विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये अपघात कमी करण्यासाठी घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना तसेच गोल्डन हवर्सचे महत्व याचे अनुषंगाने रस्ते सुरक्षा अभियान व जन जागृती मोहीम या विषयावर पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस उप निरीक्षक गणेश बुरकुल यांनी प्रबोधन केले.

         महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीतील जुना मुंबई पुणे  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील  जनता माध्यमिक विद्यालय व ज्युनियर काॅलेज अजिवली ता.पनवेल या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्त्राचे  पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, महामार्ग पोलीस रायगड विभागाचे पोलीस उप अधीक्षक घनश्याम पालंगे, महामार्ग पोलीस पनवेल विभाग गौरी मोरे यांच्या मागदर्शनाखाली महामार्गावर होणारे अपघात त्याचे कारणे व परिणाम तसेच सदर अपघात कमी करण्यासाठी घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना तसेच गोल्डन हवर्सचे महत्व याचे अनुषंगाने रस्ते सुरक्षा अभियान व जन जागृती मोहीम या विषयावर प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. यावेळी वाहतुकीचे नियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन व चर्चा करून मोटर सायकल चालक हे हेल्मेट असताना ते परिधान न करता मोटरसायकलचा आरशाला किंवा हँडलला लावून मोटर सायकल चालवत असतात. हेल्मेट हे डोक्याचे संरक्षणासाठी आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी, मोटर सायकल चालवणाऱ्या व्यक्तीने तसेच मागे बसणाऱ्या व्यक्तीने नेहमी हेल्मेटचा वापर करावा. ट्रिपल सीट बसवून मोटर सायकल चालवू नये. धोकादायकरित्या मोटरसायकल चालवू नये, मोटरसायकल चालविताना मोबाईलवर संभाषण करू नये, कोणत्याही प्रकारचे मद्य प्राशन करून मोटर सायकल  चालवू नये, 18 वर्षाखालील मुलांनी व लायसेन्स नसलेल्या व्यक्तीने मोटर सायकल चालवू नये, पालकांनी 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलांना मोटार सायकल अथवा वाहन चालवण्यास देऊ नये, 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांचे पालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येते 
हे पालकांनी नेहमी लक्षात ठेवावे, पोलिसांना बघून पळून जाताना मोटार सायकल/ वाहन अति वेगाने किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, मोटर सायकल किंवा वाहन चालवण्यापूर्वी ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी, मोटर सायकल किंवा वाहन चालवताना मार्गीका बदलताना व ओव्हरटेक करताना इंडिकेटर चा उपयोग करावा, वाहन चालक यांनी महामार्गावर दिलेल्या वाहतूक चिन्हांचे व सूचनांचे अनुसरून वाहन चालवणे व वाहतुकीचे नियमांचे पालन करणे, रस्ता ओलांडताना पादचारी यांनी फुटपाथ अथवा भुयारी पूलाचा वापर करावा व रस्त्याचे आजुबाजुचे वाहन पाहून सुरक्षित रस्ता ओलांडावा, रस्त्यावर चालताना रस्त्याचे डावे बाजूने न जाता (Walk on right) उजव्या बाजूने चालावे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त मालाची अथवा प्रवाशांची वाहतूक करू नये, अपघातामधील व्यक्तींना तात्काळ योग्य ती मदत पुरवून झालेल्या अपघाताबाबत 9833498334  / 100 / 112/ 108/  8652085500 या क्रमांकावर कॉल करून घटनेबाबत माहिती द्यावी, वाहन चालविताना नियमित सिट बेल्टचा वापर करावा, पावसाळ्यात वाहन चालवताना मोटरसायकल घसरून अपघात होऊ नये या दृष्टीने वाहन चालवावे, ओव्हरटेक करताना काळजीपूर्वक समोरील येणारे वाहनाचा अंदाज घेवून ओव्हरटेक करावे, रात्रीचे वेळी वाहन चालवितांना पुरेशी झोप घेऊनच वाहन चालवावे, हे वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत माहिती देऊन जनजागृती आणि प्रबोधन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपापले स्तरावर आपापले परीने नातेवाईक मित्रमंडळी यांना सदर कार्यक्रमाबाबत माहिती देऊन रस्ता सुरक्षा अभियान व जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत  तसेच मृत्युजंय दुत व स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा  बाबत माहीती दिली व अपघात समयी जखमींना हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आलेले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून पेन व बिस्किट पाकीट यांचे वाटप करण्यात आलेले आहे. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.के.पाटील, ससाणे सर, यादव मॅडम, शिक्षकवृंद आणि 120 विद्यार्थी व  विद्यार्थिनी उपस्थित होते. थोडे नवीन जरा जुने