पनवेल दि.०५ (संजय कदम) : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे . त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम रायगड जिल्ह्याच्या वतीने गांधी वाचनालय पेण येथे आयोजित करण्यात आला.
या श्रद्धांजलीचा कार्यक्रमाला युवा नेते अनिकेत संसारे, प्रमोद कांबळे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष विजय धोत्रे, अमित कांबळे, मुमताज पठाण , भारत दाताड, समाधान कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, दिपक सोनावणे, माजी नगरसेवक जनार्दन जाधव, संदिप सुर्वे, गंगाराम गायकवाड, संदेश गायकवाड, महाड येथील महेंद्र जाधव, अनिल पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महेश साळुंखे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले मनोज संसारे हे नामदेव ढसाळ व भाई संगारे यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते होते. रिपब्लिकन चळवळीचा ढाण्या वाघ म्हणुन ते मुंबईत प्रसिद्ध होते. मुंबईतील झोपडपट्टीतील जनतेचे प्रश्न, महाराष्ट्रातील दिन दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे घालवली.
संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अकाली निधनाने आंबेडकरी चळवळीची अपरीमीत हानी झाली आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. गेली तीस वर्षे ते आंबेडकरी चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत होते असे सांगितले.
Tags
पनवेल