इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी डॉ. शितल फरांदे-कांडपिळे पनवेल । वार्ताहर


इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी डॉ. शितल फरांदे-कांडपिळे
पनवेल । वार्ताहरइनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यूपनवेलचा पदग्रहण समारंभ तथास्तू हॉल, पनवेल येथे संपन्न झाला.सन २०२३-२०२४ करिता डॉ. शितल फरांदे-कांडपिळे यांची अध्यक्षपदी निवड झाली तर सेक्रेटरीपदी भूमिका परमार, व्हाईस प्रेसिडेंट प्रिती जेठीया, खजिनदार दिपा अडमुठे, आयएसओ अर्चना राजे,एडिटर शितल वळंजू, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर कल्पना कोठारी तर सल्लागार समितीमध्ये सुनिता कांडपिळे, डॉ. हेमा परमार, स्नेहल वाडकर, लता शहा आणि उत्का धुरी यांची निवड करण्यात आली.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रीक इएसओ डॉ.शोभना पालेकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मावळत्या अध्यक्षा पल्लवी धारगळकर यांनी वर्षभर केलेल्या सहकार्याबद्दल सदस्यांचे आभार मानले.


सेक्रेटरी ममता राजीवन यांनी क्लबने वर्षभरात केलेल्या विविध प्रकल्पाची माहिती सांगितली. प्रमुख पाहुणे शोभना पालेकर यांनी क्लबने केलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच क्लबला मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वर्षाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


नवीन अध्यक्षा डॉ. शितल फरांदे-कांडपिळे यांनी पुढील वर्षीच्या प्रकल्पाची माहिती दिली. क्लबच्या खजिनदार भूमिका परमार यांनी गतवर्षाचा अहवाल वाचला. व्हाइस प्रेसिडन्ट प्रिती जेटीया यांनी उपस्थितांचे आभार मानले.


थोडे नवीन जरा जुने