पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नितीन ठाकरे तर खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी चंद्रकांत लांडगे यांची वर्णी

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नितीन ठाकरे तर खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी चंद्रकांत लांडगे यांची वर्णी पनवेल दि.२५ (संजय कदम) : पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस दलामध्ये फेरबदल केले आहे. यामध्ये पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नंदुरबार येथून आलेल्या नितीन ठाकरे यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर खांदेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून चंद्रकांत लांडगे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तळोजा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान नितीन ठाकरे यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.   


                कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या झाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रभारी अधिकारी आणि इतर जागा रिक्त होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नव्याने नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहे. 38 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सूर्यकांत कांबळे यांची उरण पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. अंजुम बागवान यांची पनवेल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वाहतूक शाखेचे संजय नाळे आता वाशी पोलीस ठाण्यात काम पाहतील. उरण वाहतूक शाखेत कार्यरत असणारे अशोक गायकवाड यांना कळंबोली पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
थोडे नवीन जरा जुने