विठ्ठल नामात दुमदुमली दुधे विटेवरी






विठ्ठल नामात दुमदुमली दुधे विटेवरी

 दूधे विटेवरी कॉम्प्लेक्स कंरजाडे, पनवेल मध्ये "देवशयनी आषाढी एकादशी" निमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६.०० वाजता विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेक पासून सुरुवात झाली. अभिषेक व पूजा नंतर ९.०० वाजता आरती करण्यात आली. ११.०० वाजता 
ओंकारेश्वर महिला मंडळाचने सूंदर भजन गायले . दुपारी २ वाजता श्री. एकनाथ ठाकूर संगीत विशारदक आणि उत्कृष्ट बासरी वादक यांनी भजन गायले. दुपारी ४ वाजता राधाकृष्ण भजनी मंडळ, कुंडे वहाळ यांनी स्वखुशीने भजन गायले. सांयकाळी ५ वाजता सीरवी समाजाच्या महिलांचे त्यांच्या भाषेत भजन गायले. सायंकाळी ६.०० वाजता दिंडीचे आयोजन केले होते.



सोसायटीच्या सर्व धर्मीय लहान मुलं आणि मुलींनी विठ्ठलाच्या वारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व महिलांनी फुगडी आणि रिंगण करुन ताळ वाजवून विठ्ठल नामाचा गजर केला. दिंडी साठी पनवेल मार्केट यार्ड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर छान साथ दिली.



संध्याकाळी ७.०० महाआरती झाली. 
रात्री ८. वाजता ह.भ.प सौ.वर्षा रानडे -सहस्रबुद्धे यांचे "जनाबाई" हे कीर्तन आयोजित केले होते.
संपूर्ण दिवस विठ्ठल नामात दुमदुमली दुधे विटेवरी. 
दुधे विटेवरी कॉम्प्लेक्स चे बिल्डर आणि सोसायटी कमिटी यांनी करंजाडे व पनवेल शहरातील सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण केले होते. जय हरी विठ्ठल 


थोडे नवीन जरा जुने