परवडणाऱ्या गृहकर्ज योजनेचा विस्तार; पनवेलमध्ये शाखा; अल्प उत्पन्न गटाला मिळणार लाभ

परवडणाऱ्या गृहकर्ज योजनेचा विस्तार; पनवेलमध्ये शाखा; अल्प उत्पन्न गटाला मिळणार लाभ 

        

पनवेल(प्रतिनिधी) ‘पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड’ने परवडणाऱ्या घरांसाठीची ‘रोशनी’ ही वित्त योजना प्रामुख्याने उपलब्ध करून देण्यासाठी बारा नवीन शाखा उघडल्या आहेत. त्यामध्ये पनवेल येथेही शाखेचा समावेश आहे. या शाखेचा उदघाटन सोहळा विक्री आणि संकलन मुख्य अधिकारी वल्ली सेकर यांच्या हस्ते व पनवेल शाखा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. पनवेल शहरातील विरुपाक्ष मंदिराजवळ सुरु करण्यात आलेल्या या शाखेत सामान्य जनांना त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टाच्या अनुषंगाने घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात ही योजना मदत करते. या योजनेच्या कार्यान्वयासाठी कंपनीने आपल्या एकंदर संरचनेत एक वेगळाविभाग निर्माण केला असून त्यामध्ये विक्री, वित्त, वसुली आणि कामकाज यांसाठी समर्पित कर्मचारी पथकांचा समावेश केला आहे. कंपनीने देशभरातील लहान शहरांमध्ये आपला विस्तार चालविला आहे. या अनुषंगाने पनवेलसह होस्कोट, केंगेरी, येलाहंका, अट्टीबेले, वाघोली, बोलिंज, तिलाई नगर, नागरकोइल, मथुरा, जोधपूर आणि अहमदाबादअशा सहा राज्यांतील शहरांमध्ये रोशनी-केंद्रित शाखांच्या उद्घाटनाची घोषणा कंपनीतर्फे करण्यात आली.विशेषकरून टियर-१, टियर-२ आणि टियर-३या श्रेणीतील शहरांच्या बाहेरील भागात ‘रोशनी’च्या माध्यमातून परवडणारी गृहकर्जाचे पीएनबी हाउसिंग फायनान्स कंपनी प्रदान करीत आहे. या योजनेत विविध गरजा भागवणाऱ्या कर्जाचे प्रकार समाविष्ट आहेत. घराची खरेदी, स्वतः करीत असलेले बांधकाम, घराचा विस्तार किंवा त्याचे नूतनीकरण, भूखंड खरेदी करून त्यावर बांधकाम आणि मालमत्तेवरील तारण कर्ज अशी कर्जे रोशनी योजनेत मिळू शकतात. त्यामुळे, प्रथमच एखादे कर्ज घेणारा नागरिक असो, किंवा औपचारिक स्वरुपाचे उत्पन्न नसलेला स्वयंरोजगार करणारा ग्राहक असो, १० हजार रुपये इतके कमी घरगुती उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटातील पगारदार असो किंवा मध्यम उत्पन्न गटातील पगारदार, हे सर्वजण या कर्जासाठी पात्र असतील.
थोडे नवीन जरा जुने