नवीन पनवेल वसाहतीमधील नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी आक्रमक; पनवेल महानगरपालिकेने तातडीने उपायोजना करण्याची केली मागणी






नवीन पनवेल वसाहतीमधील नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी आक्रमक; पनवेल महानगरपालिकेने तातडीने उपायोजना करण्याची केली मागणी
पनवेल दि.१५(संजय कदम) : नवीन पनवेल वसाहतीमध्ये होत असलेल्या नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी आज पनवेल महानगरपालिकेवर धडक मारत नवीन पनवेल मधील रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याची समस्या, रस्त्यांवरी खड्डे व बेकायदेशीररित्या उभीकरून ठेवण्यात येत असलेली वाहने तसेच फेरीवाल्यांचा प्रश्न यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने उपायोजना करण्याची मागणी निवेदाद्वारे केली आहे. 



       यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून नवीन पनवेल वसाहतीमध्ये कचरा रस्तोरस्ती पडला असून, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आरोग्याच्या धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या नवीन पनवेल महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त संजय पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.



 नवीन पनवेल मधील काही सेक्टर्समध्ये महानगर निगम गॅस पाईपलाईन साठी खोदण्यात आलेला रस्ता  दुरुस्त न केल्यामुळे पावसाच्या पहिल्याच दिवशी रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये चिखल होऊन संपूर्ण रस्ता चिखल, खडी आणि खड्याने भरून गेला असून दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व इतरांना ये - जा करायला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे



. ह्या समस्यांसाठी महानगरपालिकेतील शहर अभियंता संजय जगताप यांची महिला आघाडीने भेट घेवून निवेदन दिले. या समस्येची दाखल घेऊन ताबडतोब त्यांनी जबाबदार कर्मचाऱ्यांना बोलावून आजच्या आज रस्त्याचे काम करण्यास सांगितले तसेच महानगर निगमच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांनी जे साहित्य रस्त्यावर टाकले ते सर्व उचलण्यात यावे अशी तंबी दिली. तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त गावडे यांना भेटून फेरीवाल्यांच्या समस्येवर देखिल चर्चा केली. या वेळी सेक्टर ८, ९ मधील नागरिक सुवर्णा पालकर, प्रियांका मोरे, उपविभाग प्रमुख राजेश वायंगणकर,  वसंत सोनवणे, उपतालुका संघटक सुगंधा शिंदे, उपशहर संघटक मालती पिंगळा, शाखा संघटक सेजल खडकवाड आदी उपस्थीत होते.





थोडे नवीन जरा जुने