पनवेल दि.१५(संजय कदम): शिवसेनेचे युवासेनाप्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)वतीने रायगड जिल्हापरिषदेच्या कोंडप येथील शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांच्यावतीने करण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांच्या वतीने गरजू व गरीब आदीवासी मुलांना शैक्षणिक साहित्य शिवसेनाउपजिल्हा प्रमुख रामदास पाटील यांच्या शुभहस्ते जिल्हापरिषद शाळा कोंडप येथे वाटप करण्यात आले.
शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या धोरणा प्रमाणे समाजकारण हेच ध्येय निश्चित करुन पनवेल तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून दुर्गम अदिवाशी भागात शैक्षणिक व शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी उपतालुका प्रमुख बबन फडके, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, जेष्ठ शिवसैनिक मारुती पालेकर, विभाग प्रमुख प्रमोद पाटील, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख विष्णू भोईर, शाखाप्रमुख पडघे काशिनाथ पाटील, शाखाप्रमुख महोदर एकनाथ शिनारे, शाखा प्रमुख मोरबे जगन्नाथ म्हात्रे, उप शाखाप्रमुख देवीचापाडा नंदू म्हात्रे, शाखाप्रमुख वावंजे परशुराम गायकर, मा.उपसरपंच चिद्रण शंकर देशेकर, अक्षय पाटील, मुख्याध्यापक असल चोचे, शिक्षक अमित सावंत उपस्थित होते.
Tags
पनवेल