शीर्षक नाही



ऑनलाईन गोल्ड व वाईन ट्रेडिंगमध्ये कामोठेमधील व्यक्तीची १ कोटी ३८ लाख रुपयांनी फसवणूक
पनवेल दि.१५ (वार्ताहर) : ऑनलाईन गोल्ड व वाईन ट्रेडिंग करण्यास भाग पाडून कामोठेमधील एका व्यक्तीची १ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.



           कामोठे परिसरात राहणाऱ्या थॉमस नावाच्या व्यक्तीबरोबर नोव्हेंबर २०२० मध्ये निकोल लीन नावाच्या महिलेने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मैत्री केली होती. वेळोवळी संवाद साधून विश्वास संपादन केला व गोल्ड ट्रेडिंग करण्याचे आवाहन केले. त्यासाठी मोबाइलवर मालामो अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला ५० हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर ५४ हजार रुपये परत मिळाले. नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत १५ लाख रुपयांचे ट्रेडिंग केले. परंतु, काहीही परतावा मिळाला नाही. यानंतर मार्च २०२१ मध्ये निकोल लीन हिने पुन्हा संपर्क साधला, झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सोबत काम करू असे आवाहन करून जीआयसी मोबाईल अॅपवरून वाईन ट्रेडिंग करण्यास सांगितले.



 मार्च ते जुलै २०२१ दरम्यान १ कोटी २३ लाख ७० हजार रुपयांची वाईन ट्रेडिंग केले आहेत. संबंधित अॅपवर २० कोटी ९५ लाख रुपये दाखविले जात होते. यामधील काही रक्कम काढण्याची विनंती केल्यानंतर निकोल हिने पुष्कर ठाकूरच्या खात्यावर पुन्हा रक्कम भरण्यास सांगितले. यामुळे पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पैसे मिळाले नाहीत. 



या प्रकरणी निकोल लीन, विजय हरीयाणी, विजय छटलानी, जगदीश वर्मा, बिना रानी, सुमीत चंद्रषर्मा, लाड देवी वैष्णव बैरागी, अर्जुन थारू, धनोजकुमार यादव व पुष्कर ठाकूर यांच्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


थोडे नवीन जरा जुने