श्रीतरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थाच्या सेवनाविषयी तळोजा पोलिसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन







श्रीतरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थाच्या सेवनाविषयी तळोजा पोलिसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  साई नारायण बाबा आश्रम येथे श्रीगुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त धार्मिकसह सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल दि.२७ (संजय कदम) : प.पू. सद्गुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आध्यात्मिक उपस्थितीत श्रीगुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ३ जुलै रोजी धार्मिक कार्यक्रमांसह गरीब मुलांना मोफत दूध आणि अन्न वाटप करण्यात येणार आहे. 



             पनवेलसह रायगड नवीमुंबई मधील लाखो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साई नारायण बाबा आश्रम येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीगुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री व्यास पूजन व महायज्ञ, गरीब मुलांना मोफत दूध आणि अन्न वाटप, तसेच आपल्या परम गुरुजींच्या पावन चरण पादुकेचा महाअभिषेक करण्यात येणार आहे



. त्याचप्रमाणे सकाळी ९ वाजता वेदमंत्र साधना, सकाळी १०.३० वाजता यज्ञोपवीत धरणं, श्री महामंत्रोपदेश, श्रीगुरु पौर्णिमेच्या महत्वावर प्रवचन, महा श्री चरण पूजा असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 




याविषयी अधिक माहितीसाठी श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी (९८१९० ७०२७७), सेक्रेटरी रामलाल चौधरी (98690 52981), राम थडानी (98206 16390) यांच्याशी संपर्क साधावा. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री भगवती साई संस्थानच्या श्री साई नारायण बाबा आश्रमतर्फे करण्यात आले आहे.  


थोडे नवीन जरा जुने