तरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थाच्या सेवनाविषयी तळोजा पोलिसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

तरुणांमध्ये वाढत्या अमली पदार्थाच्या सेवनाविषयी तळोजा पोलिसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पनवेल दि.२७ (संजय कदम) : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त औचित्य साधून इलाईट पब्लिक स्कूल, तळोजा आणि परशुराम जोमा म्हात्रे महाविद्यालय, नावडे या ठिकाणी तळोजा पोलिसांनी तरुणांमध्ये वाढणाऱ्या अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामाबाबत माहिती दिली   


 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत अंतर्गत तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी तळोजा फेज वन येथील इलाईट पब्लिक स्कूल आणि नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच तरुणांमध्ये वाढणाऱ्या अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या परिणामाबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने