गाडीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळगाडीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ
पनवेल दि.१९ (वार्ताहर) : नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १७ मध्ये उभ्या चारचाकी गाडीमध्ये एका इसमाचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
             नवीन पनवेल सेक्टर १७ या ठिकाणी असलेल्या उत्सव बार समोरील रस्त्यावर सिल्वर रंगाच्या मारुती स्विफ्ट गाडी क्र एमएच ०१ एई ७४९२ मध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. प्रशांत खुशलचंद शर्मा असे या मयत व्यक्तीचे नाव असून अधिक चौकशीमध्ये गेल्या तीन दिवसापासून प्रशांत शर्मा हे आपल्या राहत्या घरी गेले नव्हते. त्यामुळे त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती. आज सकाळी सेक्टर १६ येथून आपल्या दुचाकीवरून सेक्टर १७ येथे जात असताना तिला आपली गाडी उत्सव बार समोर उभी असलेली आढळली. त्यामुळे तिने आत डोकावले असता प्रशांत हा ड्रायविंग सीटवर आडवा झालेला आढळला. मोठ्या प्रयत्नाने गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर प्राथमिक तपासणीत तो मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच खान्देश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेची प्राथमिक चौकशी करून त्याचा मृत्यू का व कशामुळे झाला याचा शोध सुरु केला आहे.


थोडे नवीन जरा जुने