शीर्षक नाही

पोलिसांचा प्रामाणिकपणा; सापडलेले पैशाने भरलेले पाकीट मालकाचा शोध घेऊन केले परत*   
पनवेल दि.०७ (वार्ताहर) : खारघर शहरात वाहतूक नियमन करत असताना हिरानंदानी उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलिस सुनील साळुंखे आणि मयूर पाटील यांना सापडलेले पैशाने भरलेले पाकीट संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन वाहतूक पोलिसांनी परत केली आहे. 
              खारघर रेल्वे स्थानकाकडे जात असताना संजय हावळे यांचे हिरानंदानी उड्डाणपूल परिसरात प्रवाशाचे पाकीट पडले. या दरम्यान खारघर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे मयूर पाटील आणि सुनील साळुंखे यांना ते पाकीट सापडले. पाकिटातील व्हिजिटिंग कार्डच्या साहाय्याने दोघा वाहतूक पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला आणि हे पाकीट संबंधिताला परत केले. या पाकिटात पैसे तसेच व काही ओळखपत्र होती. काही तासातच संबधित व्यक्तीचा शोध घेत त्यांना त्याचे पाकीट परत केल्याने दोघा वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
थोडे नवीन जरा जुने