ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड च्या माध्यमातून आदिवासी शेतकरी बांधवांना भाजीपाला व भात बियाणे वाटप






ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड च्या माध्यमातून आदिवासी शेतकरी बांधवांना भाजीपाला व भात बियाणे वाटप*
पनवेल दि.०७ (वार्ताहर) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेडच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील लहान धामणी, मोठी धामणी, औशाची वाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला व भात बियाणे वाटप करण्यात आले.




      ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड आणि सावली संस्था यांच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना नेहमी फायदा होतोय. आता पर्यंत कंपनीच्या माध्यमातून फळझाडे, घरकुल, करोना काळातील अन्नधान्य वाटप केले आहेत. या सारखे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले आहे.



 त्यामुळे आपल्या आदिवासी बांधवानी ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड आणि सावली संस्था यांना सहकार्य करावे असे आवाहन आदिवासी ठाकूर संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सिताराम चौधरी यांनी आदिवासी बांधवाना केले आहे. तसेच भात बियाणे वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्याने आपले मनोगत व्यक्त केले. 




यावेळी ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेड सी. एस. आर. मॅनेजर नितीन कांबळे, सावली संस्था अध्यक्ष विजय घोलप, सचिव तथा समाजविकास अधिकारी शांताराम माने, प्रकल्प समन्वक बाबुराव शेंडगे, आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे पनवेल तालुक्याचे कार्यकर्ते पोलीस पदु दोरे, आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा, ग्रामपंचयात सदस्य जनार्दन निरगुडा, समाजसेवक संजय चौधरी, समाजिक कार्यकर्ते बाळू चौधरी, गणेश शिद, शनिवार वाघ आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.



फोटो : आदिवासी शेतकरी बांधवांना भाजीपाला व भात बियाणे वाटप
थोडे नवीन जरा जुने