पनवेल डॉक्टरर्स जनरलप्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात


पनवेल डॉक्टरर्स जनरलप्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात* 
पनवेल दि.०७ (वार्ताहर) : पनवेल डॉक्टरर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे कौटुंबिक स्नेहसंमेलन नुकतेच कर्नाळा अभयारण्यातील विसावा रिसोर्ट येथे मोठया उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले. दीपप्रज्वलनाने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाला पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, डॉ.गिरीश गुणे, अस्थीरोग तज्ञ डॉ संतोष पांढरे, निवडणूक अधिकारी मिलिंद खारपाटील, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, निकम परमार हॉस्पिटल चे डॉ रणजित माळी, यशोदा हॉस्पिटल चे डॉ बाळासाहेब कडबडे ,एम ओ सी हॉस्पिटल चे डॉक्टर देवेंद्र पाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जे एम म्हात्रे आणि डॉ गिरीश गुणे यांनी चांगले काम करणाऱ्या या संस्थेचे कौतुक करून संस्थेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


                  यावेळी सुरुवातीला निवडणूक अधिकारी मिलिंद खारपाटील यांनी 2023 ते 2028 या पाच वर्षासाठी निकाल जाहीर केला. यामध्ये डॉ वैभव काशिनाथ मोकल यांची अध्यक्ष तर डॉ सागर चौधरी-उपाध्यक्ष, डॉ रविंद्र तुळशीराम राऊत-सचिव , डॉ संदेश दीनानाथ बहाडकर..खजिनदार, डॉ गजेंद्र प्रकाश सिलीमकर..सदस्य, डॉ सिद्धार्थ यादेव कौशिक..सदस्य, डॉ सचिन एकनाथ पाटील सदस्य, डॉ सुदर्शन सोमनाथ मेटकर.सदस्य, डॉ सोनल सचिन शेठ ..सदस्या, डॉ अनघा वैभव चव्हाण ..सदस्या यांची निवड जाहीर करताच उपस्थित डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबियांनी टाळ्यांचा कडकडाट केला .
यावेळी मनोरंजनसाठी हरेश मोकल यांचा गाण्यांचा कार्यक्रम झाली. टाळ्या आणि वनस मोअर असा जोरदार प्रतिसाद मिळाला.याचबरोबर डॉक्टर्स आणि त्यांच्या मुलांनी उत्कृष्ट नृत्य करून रसिकांची मने जिंकली.हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी मोबाईल चे दुष्परिणाम आणि आगरी हळद याबद्दल प्रबोधन करताना सर्वाना पोट धरून हसवले.240 सदस्य असलेल्या या संघटनेमध्ये 90 महिला डॉक्टर आहेत. दरवर्षी प्रमाणे येणाऱ्या आषाढी एकादशीला या संघटनेचे 25 डॉक्टर्स पंढरपूर येथे डॉक्टरी सेवेसाठी जाणार आहेत.तसेच आम्ही समाजासाठी काही चांगले करू इच्छितो असे डॉ.वैभव मोकल यांनी यावेळी सांगितले.यावेळी जेष्ठ डॉक्टर नितीन पोवळे, डॉ आरिफ दाखवे, डॉ मनोज मयेकर, काशीनाथ मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने