स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा फक्त मतांसाठी खेळ; प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या विमानतळ दौऱ्यावर टीका







स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा फक्त मतांसाठी खेळ; प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या विमानतळ दौऱ्यावर टीका*




पनवेल दि.०८ (वार्ताहर) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलवे येथे त्यांच्या दौऱ्यादरम्यान विमानतळ परिसर आणि कामकाजाची पाहणी केली. तसेच येत्या २०२४ पासून विमान उडणार अशा वल्गना केल्या. परंतु विमानतळाचे नामांतराबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे मिंधे सरकारची स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा फक्त मतांसाठी खेळ असल्याची टीका दि. बा. पाटील साहेब प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी केली आहे.  



 उलवे येथे तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी नवी मुंबई विमानतळ परिसर आणि कामकाजाची पाहणी केली. तसेच येत्या २०२४ पासून विमान उडणार असल्याचे माध्यमांना सांगितले मात्र यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे दैवत वंदनीय दि. बा. पाटील साहेब यांचे नाव विमानतळाला द्यायच्या आश्वासनाचे काय झाल ह्यावर चक्कार शब्द काढला नाही.


 त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावनेचा फक्त मतांसाठी खेळ करून पुन्हा एकदा आश्वासनाची विमान उडवण्याचे काम सत्ताधार्यांकडून चालू आहे अशी टीका बबनदादा पाटील यांनी केली. तसेच त्यानी हे विमान तात्काळ खाली उतरवाव आणि दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करत विमानतळाचे नामकरण घोषित करायला विलंब का होत आहे त्याच उत्तर द्याव असा सवाल दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने बबनदादा पाटील यांनी विचारला आहे.



थोडे नवीन जरा जुने